जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर फ्लेक्स, हातगाड्या तात्काळ हटवा, अन्यथा कारवाई; पोलीसांचा इशारा

रस्त्यावरील हातगाडी आणि फ्लेक्स, बॅनर तात्काळ हटवा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्तिक सत्यपाल यांनी दिला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 30 Jun 2023
  • 02:35 pm
old Mumbai-Pune highway : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर फ्लेक्स, हातगाड्या तात्काळ हटवा, अन्यथा कारवाई; पोलीसांचा इशारा

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर फ्लेक्स, हातगाड्या तात्काळ हटवा, अन्यथा कारवाई; पोलीसांचा इशारा

हातगाड्या, दुकानाच्या सामानामुळे वाहतूक कोंडी पडतीये भर

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर रस्ते खोदाई आणि मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात हातगाडी आणि फ्लेक्स लावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अधिच होत असलेल्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील हातगाडी आणि फ्लेक्स, बॅनर तात्काळ हटवा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्तिक सत्यपाल यांनी दिला आहे.

याबाबत बोलताना कार्तिक सत्यपाल म्हणाले की, सध्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावरील सर्व दुकान चालकांना मी आदेश देतो की, तुमच्या दुकानाचे फ्लेक्स बोर्ड, बॅनर आणि दुकानाचे सामान दुकानाच्या आत लावा, रस्त्यावर लावू नका. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे.

परंतु सुचना दिल्यानंतरही फ्लेक्स बोर्ड, बॅनर आणि दुकानाचे सामान आत घेतले नाही तर आम्ही महाराष्ट्र पोलीस कलम १०२ नुसार तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. यासोबतच सर्व हातगाडी चालकांना विनंती करतो की, त्यांनी आपल्या हातगाड्या आणि सामान रस्त्यावर लावू नयेत. मात्र, सुचना दिल्यानंतर देखील तुम्ही ऐकायला तयार नसतील तर आम्ही कलम २८६ नुसार कारवाई करू, अशा इशाराही कार्तिक सत्यपाल यांनी दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest