पिंपरी चिंचवड : ऑनलाइन क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आयपीएलवर बेकायदेशीरपणे ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 11 May 2023
  • 01:16 pm
 ऑनलाइन क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

ऑनलाइन क्रिकेट बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

दोघांना पोलीसांनी केली अटक

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आयपीएलवर बेकायदेशीरपणे ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

सनी प्रेमचंदगुरनानी (वय ३३ वर्षे, रा. साधु वासवानीगार्डन समोर, पिंपरी) आणि सचिन सुदाम हासनदासानी (रा. साई रेसिडेन्सी काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी शिवाजी नामदेव मुंढे यांनी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट २ च्या पोलीसांकडे फिर्याद दिली होती.

इंडियन प्रीमियर लीग (IPL)चे सामने जसजसे रंगत चालले आहे. तसतसे आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजीची अनेक प्रकरणे पिंपरी आणि पुण्यातून समोर येत आहेत. अशाच एका घटनेत पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑनलाइन सट्टेबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी प्रेमचंदगुरनानी आणि सचिन हसंदासानी याने T20worldexchange.com या वेबसाईटवर May3210 या आयडीचा वापर करुन ऑनलाइन सट्टा लावला होता.

याची माहिती मिळाताच पोलीसांनी कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ (अ) आणि भारतीय टेलिग्राफ कायद्याच्या कलम २५ (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest