भक्ती शक्ती उड्डाणपूलावर वाळूचा डंपर उलटला
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूलावर आज (दि. 28) दुपारी एक अपघात घडला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एक वाळूचा डंपर उलटला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी चालक जखमी झाला आहे. डंपरमध्ये असलेली वाळू पुलावर पसरली होती
या अपघातामुळे पुणे आणि मुंबई यांना जोडणारा भक्ती शक्ती उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे, मुंबईकडे जाणाऱ्या आणि पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागला. पुणे आणि मुंबईकडून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.
डंपरमध्ये असलेली वाळू पुलावर पसरली होती. ही पसरलेळी वाळू बाजूला केली गेली. त्यानंतर दुपारी उशिरा भक्ती शक्ती उड्डाणपूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. परंतु परिस्थिती नियंत्रित करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.