संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि निगडी येथील महाराणा प्रताप यांचा पुतळा आणि इतर स्मारकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेकडून दिवस-रात्र सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच, इतर ठिकाणीही सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत.
महापुरुषांच्या पुतळ्याच्या सुरक्षेत हयगय न करण्याच्या सक्त सूचना राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना केल्या आहेत. त्यानुसार, महापालिकेने शहरातील पुतळे आणि स्मारकांची सुरक्षा वाढवली आहे. तसेच, पुतळ्याचे स्ट्रॅक्चरल ऑडिट करण्यात आले आहे.
थेरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आहे. तेथे शिवाजी महाराजांच्या जीवनप्रसंगावरील म्युरल्सही आहेत. तेथे कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, निगडी येथील महापालिकेने उभारलेले उद्यान महाराणा प्रताप यांचा अर्धपुतळा आहे. त्या ठिकाणीदेखील सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनच्या वतीने लाईटहाऊस कौशल्य विकास व रोजगार निर्मिती प्रकल्प राबवला जात आहे. त्या केंद्रांत तरुणी व महिला प्रशिक्षण घेतात, महिलांच्या सुरक्षेसाठी दापोडी येथील केंद्रावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. 'ह' क्षेत्रीय कार्यालयाच्या झिरो वेस्ट मॅनेजमेंटसाठी लावण्यात आलेल्या डस्ट रिमूव्हर मशिनवरील १० व ३० हॉर्स पॉवरची विद्युत मोटार चोरीला गेली आहे. त्या ठिकाणीही सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी महापालिकेने सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत.