देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयातून मुक्त व्हावे, निगडी येथील जनआक्रोश निषेध आंदोलनात मागणी

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली असून परिस्थिती गंभीर बनली आहे. यात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्याला निष्पक्ष, पूर्ण वेळ गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या व्यापक हिताचा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गृह खात्याच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे आणि नव्या व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवावी, अशी मागणी गुरुवारी निगडी येथील जन आक्रोश आंदोलनात करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 10 Jan 2025
  • 01:04 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली असून परिस्थिती गंभीर बनली आहे. यात सुधारणा घडवून आणण्यासाठी राज्याला निष्पक्ष, पूर्ण वेळ गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या व्यापक हिताचा विचार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी गृह खात्याच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे आणि नव्या व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवावी, अशी मागणी गुरुवारी निगडी येथील जन आक्रोश आंदोलनात करण्यात आली.

महाराष्ट्र प्रचंड अस्वस्थ आहे. गुंडगिरी आणि दहशतीच्या वातावरणामुळे राज्यात शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक, विकास होण्यास अडचण निर्माण झाली आहे. राजकीय वरदहस्तामुळे जिल्ह्या-जिल्ह्यात गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी गुरुवार ( दि. ९) रोजी निगडी येथे

मराठा क्रांती मोर्चा, राजकीय पक्ष व पुरोगामी संघटनांच्या वतीने जन आक्रोश धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार जयराज देशमुख यांना देण्यात आले. यावेळी मानव कांबळे, प्रकाश जाधव, संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, मारुती भापकर,नरेंद्र बनसोडे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

यावेळी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर निर्घृण हत्या, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत झालेला मृत्यू (हत्या), पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे भटक्या विमुक्त समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर लैगिक अत्याचार करून करण्यात आलेल्या हत्या, राज्यभर अनेक ठिकाणी राजकीय वरदहस्ताने  होत असलेले खंडणीचे गुन्हे, तसेच अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर होत असलेले बलात्कार, विनयभंग यासारखे गुन्हे यामुळे राज्यात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, प्रदीप पवार, अरुण पवार,  विश्वनाथ जगताप,गणेश देवराम,विशाल मिठे,विष्णू मांजरे,जयंत गायकवाड,नकुल भोईर,संजय जाधव,शहाजी कारकर,शशिकांत औटी,महेश कांबळे,रवींद्र चव्हाण,शांताराम खुडे,संतोषराजे निंबाळकर,संपतराव जगताप,वसंत पाटील इत्यादी मान्यवरांसह हजारो आंदोलक उपस्थित होते. जीवन बोराडे यांनी आभार मानले.

Share this story

Latest