पिंपरी-चिंचवड : विरोधी मुलांसमवेत फिरल्याबद्दल अल्पवयीनास जीवघेणी मारहाण

विरोधक मुलासोबत फिरतो म्हणत दोन तरुणांनी अल्पवयीन मुलाला लोखंडी टॉमीने जीवघेणी मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.१५) पिंपरी चौकात  घडली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

पिंपरी : विरोधक मुलासोबत फिरतो म्हणत दोन तरुणांनी अल्पवयीन मुलाला लोखंडी टॉमीने जीवघेणी मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.१५) पिंपरी चौकात  घडली. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. यावरून अदनान शेख  (वय २२) व नन्या (वय अंदाजे १९ ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा विरोधक गँगच्या मुलासोबत फिरतो या  रागातून अदनान शेख याने तुला जिवंत सोडत नाही, म्हणून कमरेचा बेल्ट व लोखंडी टॉमीने मारहाण केली. फिर्यादी तेथून पळाल्यावर आरोपींनी पाठलाग करत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच आम्ही इथले भाई आहोत ,सर्वांना  संपवून टाकेन म्हणत धमकी दिली. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Share this story

Latest