Shankar Jagtap : महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा 'श्रीगणेशा'

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा आज थेरगाव येथे शुभारंभ झाला. गणेश नगर येथील श्री गणरायाच्या चरणी नारळ वाढवून भव्य पदयात्रा काढण्यात आली.

Shankar Jagtap

Shankar Jagtap

पदयात्रेत महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकजूट

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा आज थेरगाव येथे शुभारंभ झाला. गणेश नगर येथील श्री गणरायाच्या चरणी नारळ वाढवून भव्य पदयात्रा काढण्यात आली. (Shankar Jagtap)

यावेळी माजी उपमहापौर झामा बारणे, चिंचवड विधानसभा प्रचारप्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, माजी नगरसेवक संतोष बारणे, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव विश्वजित बारणे, माजी नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर, आरपीआय पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, भारत केसरी पै. विजय गावडे, बबलू सोनकर, अभिषेक बारणे, राकेश बारणे, सनी बारणे, दिगंबर गुजर, करिष्मा बारणे, राजेश पुरोहित, रवी भिलारे, विनोद फंड, रशीद शेख, रोहन कुंभार, प्रताप बारणे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवारी (दि. २८) भव्य शक्तिप्रदर्शन  करत शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लगेचच मंगळवारी थेरगाव येथे प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी थेरगावमधील लोकमान्य कॉलनी, दुर्गा कॉलनी, गणपती मंदिर रोड, एकता कॉलनी, बुद्ध विहार, शिव कॉलनी, ओंकार कॉलनी, मंगल नगर, प्रेरणा शाळा रोड, गुजर नगर, संतोष नगर, जयभवानी नगर, १६ नंबर, गणेश कॉलनी, शिवदर्शन कॉलनी मार्ग, स्वप्न पुष्प कॉलनी, आदर्श कॉलनी, कन्हैया पार्क, ओंकार पार्क, बारणे कॉर्नर, पवार नगर, क्रांतिवीर नगर, तुळजाई कॉलनी, वनदेव नगर, आनंदवन सोसायटी, अभिजित पार्क, रॉयल कोर्ट, आनंद पार्क, श्रीकृष्ण कॉलनी, भोईर इस्टेट, डांगे चौक, डांगेचौक - चिंचवड रोड, सदाशिव कॉलनी दत्त मंदिर, दत्तनगर, अरुण पार्क या भागात पदयात्रा काढत जगताप यांनी नागरिकांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले.

थेरगावमधील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात जगताप यांचे ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले. यावेळी महिलांनी जागोजागी जगताप यांचे औक्षण केले. व आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास दिला. पदयात्रेदरम्यान जगताप यांनी थेरगावमधील तक्षशिला बौद्ध विहारासह विविध धार्मिक स्थळांना आणि समाज मंदिरांना भेट दिली. यावेळी समाजबांधवांच्या वतीने जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Share this story