पिंपरी-चिंचवड: बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या मानधनात वाढ

महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका व बालवाडी सेविका यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला. त्या प्रस्तावास शनिवारी (८ जून) त्यांनी स्थायी समितीची मान्यता दिली. बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या मानधन वाढीसह  महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजुरी दिली.महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका व बालवाडी सेविका यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला. त्या प्रस्तावास शनिवारी (८ जून) त्यांनी स्थायी समितीची मान्यता दिली. बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या मानधन वाढीसह  महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजुरी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 11 Jun 2024
  • 11:11 am
pimpri chinchwad

पिंपरी-चिंचवड: बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या मानधनात वाढ

स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने घेतला निर्णय, आयुक्तांनी दिली दहा टक्के वाढ करण्यास मान्यता

विकास शिंदे :
महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका व बालवाडी सेविका यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला. त्या प्रस्तावास शनिवारी (८ जून) त्यांनी स्थायी समितीची मान्यता दिली. बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या मानधन वाढीसह  महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजुरी दिली.

यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढण्यासाठी लेखा विभागामध्ये २ सेवानिवृत्त कर्मचारी मानधनावर नियुक्ती करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या सेंट्रल गॅस प्लँटच्या निखळलेल्या पाईपलाईन दुरुस्ती, वैद्यकीय विभागाकडील नवीन ४ रुग्णालय व वायसीएममधील नवजात शिशू विभागाकरीता निओनेटल व्हेंटिलेटर खरेदी करणे, शहरात ठिकठिकाणी बोअरवेल घेणे, जुन्या बोअरवेलची देखभाल दुरुस्ती करणे, स्थापत्य विषयक कामे करणे, ठिकठिकाणी सुशोभिकरण करणे, आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करणे, नवीन कूपनलिका करणे, पाईपलाईन टाकणे, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, ठिकठिकाणी वॉल्व बसवणे, जलवाहिन्या टाकण्याकरिता खोदण्यात आलेल्या ट्रेंचेसचे डांबरीकरण करणे आदी कामांसाठी मान्यता देण्यात आली. 

दरम्यान, लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर आयुक्त सिंह यांनी शासकीय सुट्टीच्या दिवशी बैठका घेऊन निर्णय घेतले आहे. स्थायी समितीच्या बैठकीत त्यांनी अनेक खर्चाचे प्रस्ताव देखील या बैठकीत मंजूर केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest