पिंपरी-चिंचवड: गडचिरोलीचा निवडणूक बंदोबस्त टाळण्यासाठी आजारपणाचे खोटे कारण दिल्याने पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित

पिंपरी-चिंचवड: लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याचे आदेश असताना पोलीस अंमलदाराने जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण दिले. बंदोबस्तासाठी गैरहजर राहणार्‍या आणि वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अंमलदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

Pimpri Chinchwad Police

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड: लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याचे आदेश असताना पोलीस अंमलदाराने जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण दिले. बंदोबस्तासाठी गैरहजर राहणार्‍या आणि वरिष्ठांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अंमलदाराला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.  (Pimpri Chinchwad News)

अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी याबाबतचे बुधवारी (दि. १७)  आदेश दिले आहेत. भूषण अनिल चिंचोलीकर (Bhushan Anil Chincholikar) (नेमणूक, मुख्यालय, पिंपरी- चिंचवड), असे निलंबित केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयीन आदेशानुसार, १२ एप्रिल ते २१ एप्रिल २०२४ या कालावधीसाठी लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी पिंपरी - चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तालयातील ५० कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याबाबत आदेश प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने या बंदोबस्तासाठी ५० कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये चिंचोलीकर यांचाही समावेश होता. दरम्यान, १० एप्रिल रोजी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची मुख्यालयात हजेरी घेतली असता चिंचोलीकर तेथे गैरहजर होते.

फोनवरून त्यांनी आजारी असल्याचे मुख्यालयास कळविले. त्यांच्या आजारपणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चिंचोलीकर हे जुलाब, उलटी, ताप, पोटदुखीचा त्रास होत असल्याने औषधोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी आले होते, असे सांगितले. तसेच, त्यांना अ‍ॅडमिट करून घेवून तपासण्या करण्यास सांगितले होते.

मात्र, चिंचोलीकर यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. तसेच, चिंचोलीकर यांना होत असलेला त्रास हा गंभीर स्वरूपाचा नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अतिमहत्वाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक केलेली असतानाही जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण सांगून बंदोबस्त चुकविण्यासाठी चिंचोलीकर गैरहजर राहिले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आदेशाची अवहेलना केली. तसेच, कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसुरी केली. त्यांचे हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, चिंचोलीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest