पिंपरीतील मोरवाडी चौकात भारतीय सैन्य दलाच्या वाहनाला अपघात
भारतीय सैन्य दलाच्या वाहनाचा पिंपरीतील मोरवाडी चौकात अपघात झाला आहे. अर्ध्या तासापूर्वीची घटना असून, या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. परंतु, यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली आहे.
दुचाकीस्वार अचानक समोर आल्याने त्याला वाचविताना ब्रेक लावल्याने हे वाहन उलटले आहे. पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने दोन आर्मी जवान हे वाहन घेऊन जात होते. क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजूला करून अग्निशमन दलाकडून रस्त्यावर पसरलेले ऑईल साफ करण्याचे काम सुरू आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.