पिंपरी चिंचवड : सहायक उद्यान निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, १७ हजाराची मागितली होती लाच

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहायक उद्यान निरीक्षकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. सहायक उद्यान निरीक्षकाने तक्रारदाराकडून सुमारे १७ हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 8 Jun 2023
  • 11:09 am
Pimpri Chinchwad  : सहायक उद्यान निरीक्षकला एसीबीच्या जाळ्यात, १७ हजाराची मागितली होती लाच

संग्रहित छायाचित्र

उद्यानाच्या विभागीय कार्यालयात एसीबीने पकडले रंगेहात

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहायक उद्यान निरीक्षकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. सहायक उद्यान निरीक्षकाने तक्रारदाराकडून सुमारे १७ हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

किरण अर्जुन मांजरे (वय ४६, सहायक उद्यान निरीक्षक, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे) असे रंगेहत पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीची कामे एका ठेकेदाराला देण्यात आले होते. या कामाची बिल मंजूर करण्यासाठी किरण मांजरे यांनी ठेकेदाराकडे १७ हजार रुपयांची मागणी केली होती.

पिंपरीतील नेहरूनगरमध्ये असणाऱ्या गुलाब पुष्प उद्यानाच्या विभागीय कार्यालयात हीच १७ हजाराची लाच स्वीकारताना किरण मांजरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून सध्या भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest