संग्रहित छायाचित्र
मावळ मतदार संघांतर्गत गुरुवारपर्यंत एकूण 38 उमेदवारा 50 अर्ज दाखल केले. त्यात आज शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांनी 24 अर्ज दाखल केले. शेवटच्या तासाभरात अर्ज भरण्यास मोठी गर्दी झाली होती.
मावळ मतदार संघात 19 एप्रिलपासून अर्ज विक्री व स्वीकृती सुरुवात झाली होती. या दिवशी सुरुवातीलाच एक अर्ज दाखल झाला होता. दरम्यान, शेवटच्या दोन दिवशी म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या दरम्यान
सर्वाधिक अर्ज दाखल झाले होते. गुरुवारपर्यंत शेवटची तारीख असल्याने 24 अर्ज एकाच दिवशी दाखल करण्यात आले. त्यात पक्षांची संख्या मोठी होती.
दरम्यान, उशिरा आलेल्या व अर्ज न भरू शकणाऱ्या दोन उमेदवारांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला. याबाबत त्या दोन्ही अर्जदारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन अर्ज स्वीकारण्याबाबत विनंती केली. मात्र, अर्ज स्वीकारू शकत नसल्याचे स्पष्ट केले. त्याबाबत दोघी उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून न्याय मागणार असल्याचे सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.