पिंपरी चिंचवडसह राज्यात आता नऊ नवे आरटीओ, सरकारचा निर्णय

राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रुपांत प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार आहे. या प्रस्तावाला राज्य सरकाराने शुक्रवारी मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात नऊ नव्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (आरटीओ) निर्मिती होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 24 Jun 2023
  • 11:46 am
RTO : पिंपरी चिंचवडसह राज्यात आता नऊ नवे आरटीओ

पिंपरी चिंचवडसह राज्यात आता नऊ नवे आरटीओ

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रुपांत प्रादेशिक परिवहन कार्यालयात

राज्यातील ९ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रुपांत प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार आहे. या प्रस्तावाला राज्य सरकाराने शुक्रवारी मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात नऊ नव्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांची (आरटीओ) निर्मिती होणार आहे.

नवीन आरटीओमध्ये पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई) आणि सातारा या कार्यालयांचा समावेश आहे. या अगोदर ही नऊ कार्यालये उप प्रादेशिक परिहवहन कार्यालये होती. यामुळे आता काही आरटीओंच्या अंतर्गत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्येही बदल झालेला आहे.

पुणे आरटीओत आता बारामती उपप्रादेशिक कार्यालय असेल. पुण्याच्या अंतर्गत असलेले पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर हे आता वेगळे आरटीओ असतील. सोलापूर अंतर्गत अकलूज उपप्रादेशिक कार्यालय असेल. याचप्रमाणे अहमदनगर आरटीओ अंतर्गत श्रीरामपूर उपप्रादेशिक कार्यालय असेल. तसेच चंद्रपूर आरटीओ अंतर्गत गडचिरोली उपप्रादेशिक कार्यालय असेल. सातारा आरटीओ अंतर्गत कराड हे उपप्रादेशिक कार्यालय असेल. या प्रमाणे इतर आरटीओंमधीलही रचना बदलण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest