पिंपरी-चिंचवड : पोलीस दलातील साहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

शहर पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी (१८ जुलै) दिले आहेत.

Pimpri Chinchwad Police

पिंपरी-चिंचवड : पोलीस दलातील साहाय्यक आयुक्तांच्या बदल्या

शहर पोलीस दलातील साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुरुवारी (१८ जुलै) दिले आहेत. यामध्ये गुन्हे, वाकड, चिंचवड आणि वाहतूक विभागाचे साहाय्यक आयुक्त बदलले आहेत. गुन्हे शाखेच्या साहाय्यक आयुक्त पदावर डॉ. विशाल हिरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त सतीश माने ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा अतिरिक्त कार्यभार वाकडचे साहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आला होता. गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये डॉ. विशाल हिरे यांची वाकड विभागातून गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

साहाय्यक आयुक्त मुगुटलाल पाटील यांची अभियान येथून बदली झाली असून, त्यांना चिंचवड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. चिंचवड विभागाचे साहाय्यक आयुक्त राजू मोरे यांची वाहतूक विभागाचे साहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली आहे. ठाणे शहर येथून ५ जुलै २०२४ रोजी पिंपरी-चिंचवड येथे हजर झालेले साहाय्यक आयुक्त सुनील कुराडे यांना वाकड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Share this story

Latest