अपघातात दुचाकीस्वार अडकला ट्रकच्या चाकाखाली, मदत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू

अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात रस दाखवला. त्यामुळे, काही वेळाने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 24 Aug 2023
  • 04:21 pm
accident : अपघातात दुचाकीस्वार अडकला ट्रकच्या चाकाखाली, मदत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू

अपघातात दुचाकीस्वार अडकला ट्रकच्या चाकाखाली, मदत न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू

पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली अडकला होता. मात्र, त्यानंतर ट्रकचालक अपघातानंतर पळून गेला. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदत करण्याऐवजी व्हिडिओ काढण्यात रस दाखवला. त्यामुळे, काही वेळाने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

रामदास वडजे (वय २७) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रामदास याचा भाऊ संजय माधव वडजे (वय २८, रा. रणदिवे बिल्डींग गुरुव्दार चौक, आकुर्डी, पुणे) यांने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रक चालक रंगनाथ रामभाऊ तांबे (वय ४५, रा. भिवंडी वाडा रोड झिडके गाव, पोस्ट दिघशी. जि. ठाणे) याला अटक कऱण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रामदास हा बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दुचाकीवरून कामाला जात होता. यादरम्यान, लक्ष्मी चौकात भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली अडकला होता. बराच वेळ दुचाकीस्वार चाकाखाली आडकला होता. यामध्ये लोकांनी मदत करण्याऐवजी फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. ट्रक चालकाने देखील घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, पोलीसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest