रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा मृत्यू

रस्ता ओलांडत असताना एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Mon, 11 Mar 2024
  • 12:58 pm
Deathofayoungmancrossingtheroad

रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाचा मृत्यू

#भोसरी

रस्ता ओलांडत असताना एका तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (७ मार्च) लांडगेनगर, भोसरी येथे घडला आहे. अरूण सीयाराम तिवारी (वय ४४ रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. बिपीनकुमार असे मयत तरुणाचे नाव आहे. फिर्यादींचा भाचा बिपीनकुमार हा रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात बिपीनकुमार हा गंभीर जखमी झाला. मात्र वाहनचालक तेथून पळून गेला. त्यामुळे बिपीनकुमार यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. यावरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest