पिंपरी-चिंचवड: आरटीओ कार्यालयाची पायरी चढा जरा जपूनच !

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील पायऱ्या चढताना नागरिक अडखळत आहेत. या कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर जाताना जिन्याचे संरक्षक स्टिलचे अँगल निखळले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून त्याची दखल घेऊन दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपयांचे महसूल मिळणाऱ्या या कार्यालयाची अशाप्रकारे दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Wed, 29 May 2024
  • 11:20 am
pimpri chinchwad rto

पिंपरी-चिंचवड: आरटीओ कार्यालयाची पायरी चढा जरा जपूनच !

जिन्यातील रेलिंगचे पाईप निखळले, कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या कार्यालयाची दुरावस्था

पंकज खोले
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील पायऱ्या चढताना नागरिक अडखळत आहेत. या कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर जाताना  जिन्याचे संरक्षक स्टिलचे अँगल निखळले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून त्याची दखल घेऊन दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपयांचे महसूल मिळणाऱ्या या कार्यालयाची अशाप्रकारे दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड आरटीओत विविध परवाने, अनुज्ञप्ती जारी करणे, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स, कंडक्टर परवाना, वैयक्तिक आणि या व्यावसायिक, परवाने, एनओसी जारी करणे यासह विविध वाहन नोंदणी, सरकारसाठी महसूल संकलन,  वाहनांची तपासणी, हायपोथेकेशन, रस्ता कर व संकलन आदी स्वरूपाची कामे चालतात. या कामासाठी विविध भागातून, तसेच ग्रामीण भागातून देखील नागरिक येत असतात. मात्र या ठिकाणी आल्यानंतर नेमका कोणता विभाग कोठे असतो याची माहिती नसल्याने कार्यालयातून वर-खाली करावे लागते. त्यातच आता कार्यालयात जिन्यात उभारण्यात आलेले रेलिंग निसटले आहे. ते कोणत्याही क्षणी ते तुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एखाद्या दुर्घटनेची वाट न बघता आरटीओ प्रशासनाने संरक्षक अँगलची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

आरटीओमध्ये दररोज जवळपास शेकडो नागरिक येतात. त्यात ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा समावेश असतो. त्यामुळे येथे नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागते. आरटीओ विभागाला वर्षभरातून जवळपास ९०० हून अधिक कोटी रुपयांचा महसूल म्हणतो. मात्र, त्यामानाने आवश्यकता सोयी सुविधा पुरवल्या जात नाही. त्यामुळे अर्जदारांनी याबाबत संताप व्यक्त केला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest