लोकसभेसाठी शहर भाजपचे 'घर चलो' अभियान

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून केंद्र व राज्य सरकारने केलेली विकासकामे आणि योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन सांगण्यात येत आहेत.

लोकसभेसाठी शहर भाजपचे 'घर चलो' अभियान

त्यानुसार चिंचवड विधानसभा मतदार संघातील 'घर चलो' अभियानाला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून शहरात “घर चलो अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी कार्यकर्ते व बूथ कार्यकर्त्यांना सोपविलेले बूथ क्रमांक १०९, ११० आणि १११ वरील नागरिकांशी संवाद साधला. बिजलीनगर, शिवनगरी, गिरिराज या भागातील ७० घरांमध्ये जावून मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यात येत होती. बिजलीनगर, वाल्हेकरवाडी या भागातील प्रत्येक घरांमध्ये जावून नागरिकांसोबत संवाद साधून मोदी सरकारने दहा वर्षातील विकासकामे, विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देवून २०४७ पर्यंत आत्मनिर्भर भारत आणि महासत्ता करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान बनविण्याच्या दृष्टीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

 यावेळी भाजप सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेविका मोनाताई कुलकर्णी, माजी सत्तारुढ पक्षनेते शामराव वाल्हेकर, बाजीराव चिंचवडे, सुपर वॉरिअर सचिन गोसावी, अनिकेत दळवी, महेश घुले, महेश कलाल, मुरलीधर चोपडे, जयवंत भोसले आदी उपस्थित होते. शंकर जगताप म्हणाले की, गोर-गरीबांचे कल्याण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने योजना राबवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात देशाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड गतीने विकास केली आहे. गरीब कल्याण, महिला सशक्तीकरण, देशांतर्गत व बाह्य सुरक्षा अशा अनेक क्षेत्रात मोठी कामगिरी करून आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाचे नाव उंचावले आहे. त्याचप्रमाणे देशातील भाजपशासित राज्यांनीही मोठा विकास केला आहे.

 लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप सरकारची विकासाची गाथा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. याकरिता ४ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत 'घर चलो' अभियान राबवण्यात आले आहे.

 घर चलो अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी दोन सत्रात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला. चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रत्येक बुथ कार्यकर्त्याकडून हे अभियान राबविले जात आहे. त्याला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही जगताप यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest