भक्ती-शक्ती टँकर अपघात, सावधानतेसाठी निगडी परिसरात वीजपुरवठा बंद

पिंपरी चिंचवडमधील निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात एलपीजी गॅसचा टँकर उलटल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवारी (दि. २५) पहाटे निगडी गावठाण व परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, सायकांळी ५ वाजताच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 26 Jun 2023
  • 02:50 pm
भक्ती-शक्ती टँकर अपघात, सावधानतेसाठी निगडी परिसरात वीजपुरवठा बंद

भक्ती-शक्ती टँकर अपघात, सावधानतेसाठी निगडी परिसरात वीजपुरवठा बंद

रविवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आला सुरळीत

पिंपरी चिंचवडमधील निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात एलपीजी गॅसचा टँकर उलटल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवारी (दि. २५) पहाटे निगडी गावठाण व परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, सायकांळी ५ वाजताच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, निगडीमधील कै. मधुकरराव पवळे पुलाजवळ मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणारा भारत पेट्रोलियमचा एलपीजी गॅस टँकरला पहाटे अपघात झाला व उलटला. टँकरमध्ये गॅस असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलीस विभागाकडून महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याबाबत कळविण्यात आले.

त्यानुसार महावितरणकडून निगडी गावठाण, सेक्टर २४ व २६ तसेच साईनाथनगर परिसरातील सुमारे ५५० ग्राहकांचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सेक्टर २६ मधील वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र पोलीस विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित परिसरात वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला व सायंकाळी ५ वाजता पूर्ववत करण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest