रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण

योग्य उपचार करत नाही म्हणत नातेवाईकांनी रुग्णालायत गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Shital Jagtap
  • Mon, 11 Mar 2024
  • 12:49 pm
Beatingthehospitalstaf

रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण

रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण

#निगडी

 याप्रकरणी एकाला अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (७ मार्च) स्टर्लिंग हॉस्पीटलच्या लॉबीमध्ये घडला आहे. याप्रकरणी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. यावरून संदिप उत्तम जाधव (वय ३८ रा. पिंपळे गुरव पुणे) याला अटक केली आहे.तसेच एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची आई हॉस्पीटलमध्ये ॲॅडमीट आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत, त्यांच्या जवळ थांबू दिले जात नाही म्हणून आरोपींनी रुग्णालयातील  कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. आरडा ओरड करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून निगडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest