पुणे/पिंपरी-चिंचवड : हेल्मेटसक्ती करण्यास सुरुवात; हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

चाकींचे शहर म्हणून पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडकडे (Pimpri-Chinchwad) पाहिले जाते. त्यामुळे दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा सातत्याने उगारला जात असून, हेल्मेट न (helmet) घालणाऱ्या तब्बल साडेबारा हजार दुचाकीस्वारांना मागील तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ६२ लाख १८ हजार ५०० इतका दंड केला आहे.

helmet

पुणे/पिंपरी-चिंचवड : हेल्मेटसक्ती करण्यास सुरुवात; हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

तीन महिन्यांत साडेबारा हजार चालकांना दंड, अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून वाहनचालकांची घेतली जातेय शाळा

दुचाकींचे शहर म्हणून पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडकडे (Pimpri-Chinchwad) पाहिले जाते. त्यामुळे दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा सातत्याने उगारला जात असून, हेल्मेट न (helmet)  घालणाऱ्या तब्बल साडेबारा हजार दुचाकीस्वारांना मागील तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ६२ लाख १८ हजार ५०० इतका दंड केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही वर्षांपासून प्राणांतिक अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यास सुरुवात केली आहे. वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न देणाऱ्या दुचाकीस्वारांवर आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मागील तीन महिन्यात पोलिसांनी १२ हजार ४६९ चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. दंड करण्यात आलेली रक्कम ६२ लाख १८ हजार ५०० इतकी आहे.

सकाळी घाई गडबड नको

मागील वर्षी शहर परिसरात एक हजारपेक्षा जास्त अपघात झाले आहेत. यामध्ये १९१ प्राणांतिक अपघात झाल्याची नोंद आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे सकाळी आठ ते दुपारी बारा यावेळेत सर्वाधिक अपघात झाले आहेत. त्यामुळे सकाळी वाहन चालवताना घाई गडबड करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ओव्हर स्पीड, डेंजर ड्राइव्ह बेततेय जीवावर

मागील वर्षी झालेल्या अपघातांमध्ये दुचाकीस्वार तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बहुतांश तरुण भरधाव वेगात, धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता ओवर स्पीड आणि डेंजर ड्राईव्ह करणाऱ्या चालकांना रडारवर घेतले आहे. 

मागील तीन महिन्यात ओवर स्पीड प्रकरणी चार हजार ४४४ जणांवर तर डेंजर ड्राइव्ह प्रकरणी ४३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

वर्षभरात ३८५ जणांचा अपघाती मृत्यू

पिंपरी- चिंचवड शहर परिसरात मागील वर्षी ३८५ तर सन २०२२ मध्ये ३७४ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. यामध्ये दुचाकीवर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. यासोबतच दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे.

शहर परिसरात होणाऱ्या अपघातात अनेकांना हेल्मेट नसल्यामुळे जीव गमवावा लागलेला आहे. हेल्मेटचा वापर केला असता, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळे हेल्मेट वापरण्याकडे 'सक्ती' म्हणून न पाहता एक गरज म्हणून पहावे. हेल्मेट न वापरता दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे.

-विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest