आजी-माजींनी थोपटले दंड

पुण्यातील राजकारण सध्या जोरदार तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी विकास कामांसाठी गुरुवारी लाक्षणी उपोषण केले. या उपोषणानंतर वडगाव शेरीचे माजी आमदार, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच या मतदारसंघात शाब्दिक युद्ध सुरु झाल्याची चर्चा आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 7 Apr 2023
  • 09:23 am
आजी-माजींनी थोपटले दंड

आजी-माजींनी थोपटले दंड

वडगावशेरीतील विकासकामांसाठी सुनील टिंगरेंनी केले उपोषण; निष्क्रियता झाकण्यासाठीच उपोषण केल्याचा मुळीक यांचा आरोप

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

पुण्यातील राजकारण सध्या जोरदार तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी विकास कामांसाठी गुरुवारी लाक्षणी उपोषण केले. या उपोषणानंतर वडगाव शेरीचे माजी आमदार, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच या मतदारसंघात शाब्दिक युद्ध सुरु झाल्याची चर्चा आहे.

विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी मतदार संघातील विविध विकास कामे होत नाहीत, प्रशासन सहकार्य करत नाही म्हणून गुरुवारी पुणे महानगरपालिकेसमोर उपोषण केले. यावेळी टिंगरे यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला. त्याला प्रत्युत्तर देत सुनील टिंगरे हे स्टंटबाजी करत असल्याचा पलटवार भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. निष्क्रिय आमदार म्हणून सुनील टिंगरे यांची ओळख असल्याचा नवा आरोपही मुळीक यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला जवळपास दोन वर्षे बाकी आहेत. त्यापूर्वी पुण्यात राजकीय वातावरण चांगळेच तापले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. मुद्दा जरी विकासकामांचा असला तरी प्रत्यक्षात व्यक्तिगत आकसापोटीच हे आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.  मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी लाक्षणिक उपोषण करताना टिंगरे यांनी, मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न उपस्थित केला आहे. सातत्याने बैठका, प्रत्यक्ष भेट आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही प्रशासनाने आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप टिंगरे यांनी केला आहे. तर  जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरे यांच्यावर सडकून टीका करत प्रशासनावरील आरोप फेटाळून लावले आहेत.टिंगरे यांचे उपोषण नसून नौटंकी असल्याचा आरोपही यावेळी मुळीक यांनी केला आहे. टिंगरे यांचे उपोषण म्हणजे आमदार म्हणून त्यांना आलेले   त्या अपयश आहे. टिंगरे यांना साडे तीन वर्षे एकही मोठे काम करता आलेले नाही. सुनील टिंगरे यांची निष्क्रिय आमदार म्हणून ओळख आहे असा टोला मुळीक यांनी लगावला आहे. मी आमदार असताना  केलेल्या विकास कामाचे श्रेय लाटण्याचे काम टिंगरे यांनी केले आहे. आता उपोषण करून ते लोकांची दिशाभूल करत आहेत. उपोषणाचे नाटक त्याचाच भाग आहे. टिंगरे यांचे ज्या बांधकाम व्यावसायिकांशी आर्थिक संबध आहेत, त्या बांधकाम व्यावसायिकांची आयकर विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही जगदीश मुळीक यांनी म्हटले आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story