राजगडावर रात्रीच्या मुक्कामास बंदी

किल्ले राजगड (ता.वेल्हे) या राज्य संरक्षित स्मारक परिसरात पर्यटकांना रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाच्या कठोर अंमलबजावणीचे पत्र पुरातत्त्व विभागाकडून भोर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना बुधवारी (१५फेब्रुवारी) देण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर तीन महिने शिक्षा, व पाच हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक, विलास वाहणे यांनी दिली आहे, मात्र या निर्णयामुळे अनेक पर्यटक, दुर्ग प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 16 Feb 2023
  • 12:49 pm
राजगडावर रात्रीच्या मुक्कामास बंदी

राजगडावर रात्रीच्या मुक्कामास बंदी

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

किल्ले राजगड (ता.वेल्हे) या राज्य संरक्षित स्मारक परिसरात पर्यटकांना रात्रीचा मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाच्या कठोर अंमलबजावणीचे पत्र पुरातत्त्व विभागाकडून भोर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना बुधवारी (१५फेब्रुवारी) देण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर तीन महिने शिक्षा, व पाच हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक, विलास वाहणे यांनी दिली आहे, मात्र या निर्णयामुळे अनेक पर्यटक, दुर्ग प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष नियम, १९६२ मधील नियम क्र. ४ नुसार एखाद्या संरक्षित स्मारकाचा कोणताही विशिष्ट भाग हा पुराणवस्तू शास्त्र अधिकारी, त्याचे अभिकर्ते, त्यांचा हाताखालील इसम व कामगार आणि अशा भागात कामावर असलेला कोणताही इतर सरकारी सेवक यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीसाठी कायमचा किंवा एखाद्या विशिष्ट मुदतीसाठी खुला असणार नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राजगड किल्ला या राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पर्यटक मुक्कामी राहत असल्याने, भोजन बनवून अनुषंगिक कचरा किल्ल्यावरच फेकून देत असल्याने, महत्वाच्या वास्तूंच्या आडोशास शौचास बसत असल्यामुळे व या सर्व बाबींमुळे किल्यावर घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य वाढत असल्यामुळे तसेच स्मारकाच्या पावित्र्याला धोका पोहचल्याने या स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात रात्रीच्या वेळेस पर्यटक यांना मुक्काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story