एक कोटीचे अफीम जप्त; राजस्थानातील आरोपीस अटक
सीविक मिरर ब्यूरो
पुण्यात तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचे अफीम पकडण्यात पोलिसांना यश आले असून, राजस्थानातून आलेल्या आरोपीस या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.राजस्थानातून पुण्यातील विमानतळ भागात अफीम या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या राहुलकुमार भुरालालजी साहु (वय ३२, रा. मंगलवाडा, जि. चितोडगड, राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. ५ किलो ५१९ ग्रॅम अफीम जप्त करण्यात आले आहे. बाजारात त्याची किंमत तब्बल एक कोटी १० लाख ३८ हजार रुपये इतकी आहे.
पोलिस निरीक्षक सुनील थोपटे यांचे पथक विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. लोहगाव भागातील पोरवाल रोड येथील एस. बी.आय बँकेजवळील आयजीधान को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गेटसमोर एकजण संशयितरीत्या थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून राहुलकुमार साहु याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अफीम आढळले.
पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, चेतन गायकवाड, संदिप शेळके, महेश साळुंखे, आझिम शेख, युवराज कांबळे, दिशा खेवलकर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली आहे.