एकच निर्धार, पुण्याच्या वाहतुकीत सुधार
तन्मय ठोंबरे
द टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या २०२२ च्या वर्गवारीत ५६ देशांच्या ३८९ शहरांमध्ये पुणे हे सहाव्या क्रमांकाचे दाटीवाटीने वसलेले शहर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याचा दोष नक्की कोणाचा? यावर नागरिक म्हणून आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, मेट्रोचे बांधकाम यासह असंख्य कारणांमुळे आज पुणे शहरावर ही वेळ आली आहे. मात्र, ही परिस्थिती बदलून वाहतुकीत सुधार घडवून आणण्यासाठी पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने 'जरा देख के चलो' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या उपक्रमात वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले अनिरुद्ध श्रोत्रिय, वसुधा श्रोत्रिय, अजिंक्य भुजंग, हरिश रहांगदाळे, महेश मगरे, विशाल श्रीवास्तव, करण उबाळे, राजू शिंदे, कृष्णा राठोड आणि लक्ष्मण गोंढा हे कल्याणीनगर व विमाननगर येथे पोहोचले होते. नगर रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करणाऱ्या वसुधा म्हणाल्या की, ‘जरा देख के चलो’मध्ये सहभागी झाल्याने मला खूप आनंद होत आहे. वाहनांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने वाहतूक पोलिसांना जबाबदार व सजग नागरिकांच्या मदतीची गरज भासत असून, आपण त्यांना मदत करायला हवी.'
शिंदे यांनी सांगितले की, ते त्यांच्या कंपनीतील पाच सहकाऱ्यांसोबत या उपक्रमात सहभागी झाले होते. ते म्हणाले, 'वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असून, नागरिकांनी त्यावर भर द्यावा आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे.'
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.