अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, विक्री

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याबरोबर इतरांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पीडितेची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडीजवळच्या माण येथे घडला आहे. २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला असून, या प्रकरणी आता पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 01:50 pm
अल्पवयीन मुलीवर  लैंगिक अत्याचार, विक्री

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, विक्री

हिंजवडीजवळच्या माण गावातील धक्कादायक प्रकार, पाचजणांना अटक

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याबरोबर इतरांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी  पीडितेची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार हिंजवडीजवळच्या माण येथे घडला आहे. २०२१ ते मार्च २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला असून, या प्रकरणी आता पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

दिलशाद इलियास शाह (वय ३८), अब्दुल जलील शाह (वय ३१), विकी विलास सूर्यवंशी (वय ३०), किरण बाळू शेळके (वय ३०), गोलू ऊर्फ आदेश कांबळे (वय २५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी १४ वर्षीय मुलीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असताना अब्दुल, विकी, किरण या तिघांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, पीडित मुलगी गरोदर राहिली. त्यानंतर विकी याने किरण शेळके आणि गोलू कांबळे यांना तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यासाठी विकी याने दोघांकडून पैसे घेतल्याचे पीडित मुलीचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे सर्व आरोपी हे स्थानिक असून, अल्पवयीन मुलगी अन्य जिल्ह्यातून कुटुंबासह माण गावात राहण्यास आली आहे.

सलून व्यावसायिक असलेल्या अब्दुल याची पीडित तरुणीशी प्रथम ओळख झाली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केले. कामगाराला ही माहिती मिळाल्यावर त्यानेदेखील पीडित मुलीवर अत्याचार करून ही माहिती मित्राला सांगितली. त्यानंतर अब्दुल याच्याकडे काम करणाऱ्या विकीने अन्य मित्रांना पीडित मुलीशी संबंध ठेवण्यासाठी पैसे घेतले.

अवघ्या १००-२०० रुपयांमध्ये आरोपींनी या मुलीची प्रत्येक वेळेस विक्री केली आहे. सुरुवातीला ही बाब पीडित मुलीच्या लक्षात आली नाही. कधी भीतीपोटी तर कधी बदनामी होण्याच्या धमकीमुळे संबंध ठेवण्यास तयार झाल्याची माहिती या मुलीने हिंजवडी पोलिसांना दिली.

वारंवार होणारा हा त्रास आणि त्यातच मुलगी गर्भवती राहिल्यावर ही घटना पीडित मुलीच्या कुटुंबाच्या लक्षात आला. सुरुवातीला हा सगळा प्रकार न्यू मेन्स पार्लरमध्ये घडल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. घटनेची माहिती पोलिसांना डॉक्टरांकडून समजली असून, तक्रार दाखल केल्यावर अधिक बदनामी होईल अशी भीती पीडित मुलीला होती. मात्र, हिंजवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महिला अधिकाऱ्यांना सांगून मुलीची समजूत काढल्यावर तिने घडलेला सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत सर्व आरोपींना अटक केली. फौजदार महादेव येलमार तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story