जरा देख के चलो मोहिमेत सहभागी होण्यासाठी आता विद्यार्थीही उतरले रस्त्यावर
विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमनाचे महत्त्व समजून घेणे आणि त्यांनी या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होणे महत्त्वाचे आहे. असे झाले तर पुढील पिढीकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. त्यासाठी पुणे टाइम्स मिरर, सीविक मिरर आणि पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या 'जरा देख के चलो' या उपक्रमात आता विद्यार्थीही सहभागी झाले आहेत.
वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व नागरिकांना कळावे, त्यांनी सुरक्षितपणे वाहने चालवावीत यासाठी 'जरा देख के चलो' चा संदेश देत विविध महाविद्यालयातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ते वाहतूक पोलिसांना वाहतूक नियमनात मदत करत असून, नागरिकांनादेखील नियम पाळण्याचे महत्त्व पटवून देत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.