नोबल'च्या डॉक्टरांकडून नवजात शिशूला जीवदान
#पुणे
नोबल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करून एका नवजात शिशूचे प्राण वाचवले आहेत. केवळ ३४ आठवड्यांचा कालावधी घेऊनच हे बाळ जन्माला आले होते (प्री-मॅच्युअर). त्यामुळे त्याला जन्मतः श्वसनाला त्रास होत होता. त्यासोबतच एएसडी, व्हीएसडी, ट्रेकीओसोफेजल फिस्टुला, अन्ननलिकेत बिघाड यांसह अनेक व्याधी, विसंगती जडलेल्या होत्या. मात्र, नोबल रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि तज्ज्ञांनी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आणि त्यामुळे बाळाला जीवदान मिळाले.
शस्त्रक्रियेनंतर बाळाला नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तेथे डॉ. अभय महिंद्रे आणि त्यांच्या टीमने बाळावर उपचार करण्यास सुरुवात केली. सलग १० दिवस त्या बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. २८ व्या दिवशी स्तनपान करून त्याला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे बाळाचे वजन वाढले आणि त्याच्यावरील धोका टळला. बाळ बरे होण्याचा मार्ग अद्यापही थोडा बिकट असला, तरी ते उपचारांना खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे.
निओनॅटोलॉजी विभागाचे संचालक डॉ. अभय बी. महिंद्रे यांनी आपल्याला त्या बाळाला आणि त्याच्या कुटुंबाला मदत करता आली याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, 'आम्ही बाळाची सर्वतोपरी काळजी घेऊ आणि या पुढील काळात ते लवकरात लवकर पूर्ण बरे होईल, असा आमचा विश्वास आहे. येत्या काही आठवड्यांत बाळाची होणारी वाढ पाहण्यास आम्ही उत्सुक आहेत.'
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.