कोथरूड आणि सांगवी गावातून नव्याने बससेवा सुरू होणार !
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दोन मार्गावर नव्याने बससेवा सुरू होणार आहे. ही बससेवा पीएमपीएमएलकडून कोथरूड, सांगवी गाव आणि पिंपळेगुरव परिसरातून सुरू होणार आहे. ही बससेवा उद्या म्हणजेच २८ एप्रिलपासून सुरू कऱण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोथरूड, सांगवी आणि पिंपळेगुरव परिसरातील नागरिकांकडून लवळे येथील सिम्बॉयसिस रुग्णालयासाठी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर या मागणीला यश आले आहे.
पीएमपीएमएल कडून प्रवाशांच्या मागणीनुसार बसमार्ग क्र. ७७ ही कोथरुड स्टॅँड ते हिंजवडी माण फेज ३ अशी धावेल. ही बस कोथरूड डेपो, चांदणी चौक, वाकड ब्रिज मार्गे धावेल. तर दुसऱ्या मार्गावरील बसमार्ग क्र. ३१० ही सांगवी गाव ते लवळे येथील सिम्बॉयसिस हॉस्पिटल अशी धावेल. ही बस पिंपळेगुरव, वाकड, बालेवाडी, सुसगाव मार्गे धावेल.
त्यामुळे, नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या या दोन्ही बसमार्गांवरील बससेवेचा लाभ प्रवाशी नागरीक, विद्यार्थी, नोकरदार, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरीक, रूग्ण यांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.