राष्ट्रवादीने कापला भाजपच्या खोट्या विकासाचा 'केक'

एकही भूल कमल का फूल, देशाला केले एप्रिल फूल’ अशी घोषणाबाजी करत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात आंदोलन केले. मागच्या आठ वर्षांत ‘अच्छे दिन’च्या भूलथापा देऊन भाजपने जनतेला ‘एप्रिल फूल’ केल्याचा आरोप करत एक एप्रिल हा भाजपच्या खोट्या विकासाचा वाढदिवस म्हणून राष्ट्रवादीने साजरा केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 02:03 pm
राष्ट्रवादीने कापला भाजपच्या खोट्या विकासाचा 'केक'

राष्ट्रवादीने कापला भाजपच्या खोट्या विकासाचा 'केक'

पिंपरीत केले अनोखे आंदोलन, 'एकही भूल कमल का फूल'च्या दिल्या घोषणा

#पिंपरी

एकही भूल कमल का फूल, देशाला केले एप्रिल फूल’ अशी घोषणाबाजी करत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात आंदोलन केले. मागच्या आठ वर्षांत ‘अच्छे दिन’च्या भूलथापा देऊन भाजपने जनतेला ‘एप्रिल फूल’ केल्याचा आरोप करत एक एप्रिल हा भाजपच्या खोट्या विकासाचा वाढदिवस म्हणून राष्ट्रवादीने साजरा केला.

खराळवाडी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे व युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपचा फसवा विकास आहे. गेल्या आठ वर्षांत ‘अच्छे दिन’च्या नावाखाली भारताच्या जनतेला ‘एप्रिल फूल’ केले आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, बेरोजगारी, महागाईने जनतेला बेजार केले. अशी परिस्थिती आजवरच्या भारताच्या इतिहासात कधीच नव्हती. आता तर जनतासुद्धा भाजपच्या या अच्छे दिन वर ‘आमचे पुराने दिनच वापस करा’ असे बोलू लागली आहे, असे शहराध्यक्ष गव्हाणे म्हणाले.  यावेळी 'एकही भूल, कमल का फूल आणि मोदीजींनी केले सर्वांना एप्रिल फूल' असा मजकूर असलेला केकदेखील कापण्यात आला. माजी नगरसेवक राहुल भोसले, पंकज भालेकर, शाम लांडे, कार्याध्यक्ष फजल शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नीलेश निकाळजे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष उमेश काटे, विनायक रणसुभे, दीपक साकोरे, राहुल पवार, उपाध्यक्ष मंगेश भुजबळकर, राजेंद्र थोरात, विकास कांबळे, मेघराज लोखंडे, शाहिद शेख, संतोष निसरगंध, संदीपान झोंबाडे, युसूफ कुरेशी, अविनाश गायकवाड, दीपक अंकुश, इरफान शेख, शाहिद इनामदार, आझर आवटी, मुवाज मुजावर, महेश यादव उपस्थित होते.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story