‘नंगा’नाच अजूनही सुरूच

लोणावळ्यातील कुरंवडे गावात मध्यरात्री एका बंगल्यात सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली. अश्लील हावभावात महिलांचे नृत्य बंगल्यात सुरू असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी दहाजणांविरुद्ध लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 'सीविक मिरर'ने फेब्रुवारी महिन्यात लोणावळा परिसरातील विविध बंगल्यात चालणाऱ्या अनधिकृत पार्ट्यांबाबत 'लोणावळा बनतंय हब ऑफ नंगानाच' या शीर्षकाखाली वृत्त देत या विषयाला वाचा फोडली होती. त्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 2 Apr 2023
  • 01:58 pm
‘नंगा’नाच अजूनही सुरूच

‘नंगा’नाच अजूनही सुरूच

लोणावळ्यातील बंगल्यात अनधिकृत पार्टी, अश्लील हावभावात सुरू होते महिलांचे नृत्य; दहा जणांच्या विरुद्ध गुन्हा

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

लोणावळ्यातील कुरंवडे गावात मध्यरात्री एका बंगल्यात सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली. अश्लील हावभावात महिलांचे नृत्य बंगल्यात सुरू असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी दहाजणांविरुद्ध लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 'सीविक मिरर'ने  फेब्रुवारी महिन्यात लोणावळा परिसरातील विविध बंगल्यात चालणाऱ्या अनधिकृत पार्ट्यांबाबत 'लोणावळा बनतंय हब ऑफ नंगानाच'  या शीर्षकाखाली वृत्त देत या विषयाला वाचा फोडली होती. त्यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान कुरवंडे गावातील मध्यरात्री सुरू असलेल्या 'नंगा'नाच प्रकरणी श्रेयस शर्मा, लक्ष्मण दाभाडे, (दोघे रा. मुंबई), कैलास पवार, गुरू पाटील (रा. लोणावळा), शिवाजी भोसले, अभिजीत सोनलकर, धनाजी जगताप, संतोष शिंदे, प्रवीण पैलवान, फिरोज तांबोळी (रा. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मनोज मोरव यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणावळ्यातील कुरंवडे गावात 'शर्मा व्हिला' या बंगल्यातून मध्यरात्रीनंतर ध्वनिवर्धकाचा मोठा आवाज येत होता. चित्रपटातील गीतांवर महिला अश्लील हावभाव करून नृत्य करत होत्या. याबाबतची माहिती लोणावळा शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. शर्मा व्हिला बंगला भाड्याने दिल्याचे चौकशीत उघडकीस आले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा परवाना नसताना बंगला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराज पाटणकर तपास करत आहेत. लोणावळा, खंडाळा परिसरात पुणे-मुंबईतील अनेक व्यावसायिक, उद्योजकांचे बंगले आहेत. बंगला भाड्याने देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळाचा परवाना लागतो. खासगी बंगल्यात मोठ्या संख्येने पर्यटक वास्तव्य करतात. अनेक बंगल्यांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असून बेकायदा बंगले भाड्याने दिले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहा महिन्यांपूर्वी लोणावळा परिसरातील बंगल्यात जलतरण तलावात बुडून वेगवेगळ्या घटनेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी लोणावळा भागातील बंगले मालकांची बैठक घेऊन सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत सूचना दिल्या होत्या. तसेच नियमांची माहिती बंगले मालकांना दिली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story