Murderous attack shopkeeper : थाळीचे पैसे मागितले म्हणून दुकानदारावर खुनी हल्ला

खरेदी केलेल्या प्लास्टिक थाळीचे पैसे मागितल्याने टोळक्याने एका दुकानदारासह दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक कमी होत चालला आहे. किरकोळ वादातून हाणामारी ते कोयत्यासारख्या शस्त्राने दहशत निर्माण करण्याच्या घटना वाढत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 1 May 2023
  • 12:34 pm
थाळीचे पैसे मागितले म्हणून दुकानदारावर खुनी हल्ला

थाळीचे पैसे मागितले म्हणून दुकानदारावर खुनी हल्ला

टोळक्याकडून दुकानदारासह दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार

#बिबवेवाडी

खरेदी केलेल्या प्लास्टिक थाळीचे पैसे मागितल्याने टोळक्याने एका दुकानदारासह दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांचा गुन्हेगारांवरील धाक कमी होत चालला आहे. किरकोळ वादातून हाणामारी ते कोयत्यासारख्या शस्त्राने दहशत निर्माण करण्याच्या घटना वाढत आहेत.  

धर्माराम बंजारा (वय २२, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी), मलंगराम बंजारा अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बंजारा यांच्यासह त्यांच्या दुकानातील काम करणाऱ्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बंजारा यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंजारा यांचे अप्पर इंदिरानगर भागात अंबिका डिस्पोझिबल अँड बर्थडे हाऊस दुकान आहे. प्लास्टिकचे ग्लास, थाळी, चमचे तसेच वाढदिवसाच्या सजावट साहित्याची बंजारा विक्री करतात. बंजारा यांच्या दुकानात प्लास्टिक थाळी खरेदी करण्यासाठी चौघेजण आले. खरेदीनंतर बंजारा यांनी थाळीचे पैसे मागितले. आरोपींनी पैसे देण्यास नकार देऊन बंजारा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बंजार यांना काठीने मारहाण करून त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले, तसेच दुकानात असलेल्या मलंगराम याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून टोळके पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक एस. एम. आदलिंग तपास करत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story