Crime against father : जुळ्या मुलींचा खून; ४ वर्षांनी पित्यावर गुन्हा

घरात मुलाच्या ऐवजी जुळ्या मुलींचा जन्म झाल्याने त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली होती. न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी वडिलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 19 Jul 2023
  • 11:48 pm
जुळ्या मुलींचा खून;  ४ वर्षांनी पित्यावर गुन्हा

जुळ्या मुलींचा खून; ४ वर्षांनी पित्यावर गुन्हा

मुलगाच पाहिजे या हट्टातून जन्मदात्याचे कृत्य

#हडपसर

घरात मुलाच्या ऐवजी जुळ्या मुलींचा जन्म झाल्याने त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली होती. न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी वडिलासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याबाबत श्रीकृष्णा प्रताप लोभे (वय ३५, रा. साई संस्कृती सोसायटी, बायफ रस्ता, वाघोली, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार या प्रकरणी मयत मुलींचे वडील अतुल बाबासाहेब सूर्यवंशी, सासरे बाबासाहेब सूर्यवंशी (वय ६२), सासू जयश्री सूर्यवंशी (५५), दीर अमोल सूर्यवंशी (२६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१८ मध्ये तक्रारदार लोभे यांची बहीण ऊर्मीलाचा विवाह अतुल याच्याशी झाला होता. 

विवाहानंतर मुलगाच हवा. मूल गोरे हवे, असे आरोपींनी ऊर्मीला हिला सांगितले. दरम्यान, तिला रिद्धी आणि सिद्धी या जुळ्या मुली झाल्या. त्यानंतर २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सात महिन्यांच्या सिद्धीला आरोपींनी जाणीवपूर्वक बाहेरील दूध पाजले. दूध पाजल्यानंतर ती अत्यवस्थ झाली आणि रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा ६ फेब्रुवारी २०२० रोजी रिद्धीला झोपेत असताना बाहेरील दूध पाजले गेले. त्यात रिद्धीचा मृत्यू झाला. रिद्धी आणि सिद्धी यांचा मृत्यू बाहेरील दूध पाजून झाला. त्यामुळे दुधात काही तरी मिसळल्याचा संशय ऊर्मीलाचा तक्रारदार भाऊ लोभे यांना होता. त्यानंतर लोभे यांनी न्यायालयात खासगी फौजदारी दावा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणी खून, कट रचणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश हडपसर पोलिसांना दिले आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस. शिवले याबाबत तपास करीत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story