मुळीक म्हणतात, आव्हाड तर औरंगजेब

भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनास जेमतेम काही दिवस होण्यापूर्वी भावी खासदार म्हणून लागलेल्या बॅनरवरून राज्यभर वातावरण तापले होते. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले होते. या बॅनर्सवर मुळीक यांचा उल्लेख भावी खासदार असा केल्याने मुळीक िटकेचे धनी झाले होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मुळीक यांच्यावर टीकास्र सोडले होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:03 am
मुळीक म्हणतात, आव्हाड तर औरंगजेब

मुळीक म्हणतात, आव्हाड तर औरंगजेब

भावी खासदार उल्लेख असलेले बॅनरचे प्रकरण, वाढदिवसाचे कार्यक्रम केले रद्द

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनास जेमतेम काही दिवस होण्यापूर्वी भावी खासदार म्हणून लागलेल्या बॅनरवरून राज्यभर वातावरण तापले होते. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी पुणे शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले होते. या बॅनर्सवर मुळीक यांचा उल्लेख भावी खासदार असा केल्याने मुळीक िटकेचे धनी झाले होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही मुळीक यांच्यावर टीकास्र सोडले होते.

बॅनरप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, माणसाने किती बेशरम असावे याला काही मर्यादा आहेत. मात्र, या मर्यादा येथे पूर्णपणे ओलांडल्या आहेत. आव्हाड यांची टीका जगदीश मुळीक यांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून त्याला  त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुळीक यांनी आव्हाड यांना औरंगजेब संबोधत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केल्याचेही बॅनर पोस्ट केले आहेत.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन होऊन तीन दिवसही झाले नाहीत तोच जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करणारे बॅनर्स लागल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली. त्यानंतर हे बॅनर्स हटवण्यात आले. आव्हाड यांची टीका जिव्हारी लागल्याने मुळीक यांनी त्यांना  ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "बरं झालं मुंब्रा येथील औरंग्यानं गरळ ओकली. या हिंदुद्वेष्ट्याकडून संस्कार शिकण्याइतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. फेक न्यूजवर पोसलेल्या या माणसानं फोटोची साधी खातरजमा करायचे कष्ट घेतले नाहीत! प्रसिद्धीसाठी देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही बनणाऱ्या जितुद्दीनला आता जनतेनं पुरतं ओळखलं आहे, अशी खोचक टीका मुळीक यांनी केली आहे.

जगदीश मुळीक यांनी पुण्यात लावलेलं एक बॅनर पोस्ट केलं आहे. त्यात त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेला निवेदन केले आहे. माझ्या वाढदिवसादिनी अर्थात १  एप्रिल रोजी दरवर्षी आपण मला भरभरून शुभेच्छा देता. विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करता. आपल्या या सदिच्छा मला आजवर निश्चितच पाठबळ देत आल्या आहेत. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. लोकनेते  गिरीशभाऊ बापट यांच्या निधनामुळे १ एप्रिल रोजी असणारा वाढदिवस रद्द केला असून या बदलाची सर्वांनी नोंद घ्यावी. वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम रद्द करण्यात आले असल्याचे पोस्टरमध्ये मुळीक यांनी म्हटले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story