लोहगावात सासूने केली सुनेचे डोके आपटून हत्या

घरोघरी मातीच्या चुली असल्याचे सांगितले जाते. तसेच महिलाच महिलेची वैरी असते असेही म्हटले जाते. त्याचाच अनुभव महिला दिनाच्या दिवशी पुण्यात आला आहे. पुण्यातील लोहगाव परिसरात सासूने सुनेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सर्व काम नीट करत नाही या क्षुल्लक कारणामुळे सुनेची हत्या केली आहे. अमानुषपणे सुनेचे डोके आपटून हत्या केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 9 Mar 2023
  • 01:02 pm
लोहगावात सासूने केली सुनेचे डोके आपटून हत्या

लोहगावात सासूने केली सुनेचे डोके आपटून हत्या

काम करत नसल्यावरून पेटले भांडण; डोक्याला मार लागल्याने सुनेचा करुण अंत

#लोहगाव

घरोघरी मातीच्या चुली असल्याचे सांगितले जाते. तसेच महिलाच महिलेची वैरी असते असेही म्हटले जाते. त्याचाच अनुभव महिला दिनाच्या दिवशी पुण्यात आला आहे. पुण्यातील लोहगाव परिसरात सासूने सुनेचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सर्व काम नीट करत नाही या क्षुल्लक कारणामुळे सुनेची हत्या केली आहे. अमानुषपणे सुनेचे डोके आपटून हत्या केली आहे.

या घटने प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितू रवींद्र माळवी (वय २८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या प्रकरणी तिची सासू कमला प्रभुलाल माळवी (वय-४९) हिला अटक करण्यात आली आहे. रितूला आठ वर्षांचा एक मुलगा असून, पती आजारी असल्यामुळे तो घरीच असतो.

माळवी कुटुंबीय हे पुण्यातील लोहगाव परिसरात राहतात. घरात सगळे कामी मलाच करावी लागतात आणि सून घरात व्यवस्थित काम करत नाही, यावरुन दोघींमध्ये अनेकदा वादावादी व्हायची. रोजच्या वादावादीमुळे घरात कायम चिंतेचे वातावरण असायचे. दोन दिवसांपूर्वी सासू घरातील फ्रिजचा दरवाजा उघडत होती. त्यावेळी सासूचा पाय चूकून सुनेला लागला. या कारणावरुन पुन्हा एकदा दोघींमध्ये भांडणे झाली. त्यानंतर सासूचा राग अनावर झाला. तिने सून रितूला मारहाण केली, सूनेचे डोके खाली फरशीवर आपटले. या घटनेत रितूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story