मावस भावाचा तीन लहान बहिणींवर प्राणघातक हल्ला

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच वारजे माळवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून मावस भावाने त्याच्या तीन लहान बहिणींवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्यात तीन अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वारजे परिसरातील दांगट वस्ती येथे हा प्रकार घडला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 27 Mar 2023
  • 11:46 am
मावस भावाचा तीन लहान बहिणींवर प्राणघातक हल्ला

मावस भावाचा तीन लहान बहिणींवर प्राणघातक हल्ला

दांगट वस्तीत क्रिकेट खेळण्याच्या वादातून केले लोखंडी रॉडने वार; हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

संपत मोरे

feedback@civicmirror.in

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच वारजे माळवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळण्याच्या वादातून मावस भावाने त्याच्या तीन लहान बहिणींवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्यात तीन अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वारजे परिसरातील दांगट वस्ती येथे हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी रामनाथ सहानी, राम सहानी आणि आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत कृष्णा सहानी याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना काल शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून नात्याने ते मावस भाऊ आहेत. शनिवारी रात्री हे दोघेजण मैदानावर क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना या दोघांमध्ये वाद झाले. याचा राग आरोपींच्या मनात होता. त्या रागाच्या भरात ते थेट कृष्णा सहानी याच्या घरात शिरले. कृष्णा याला मारण्यासाठी ते घरात शिरले पण त्यांना कृष्णा घरात दिसला नाही.

त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्याच्या घरात असलेल्या महिला आणि तीन लहान बहिणींवर हल्ला चढवला. या हल्ल्यात तीन अल्पवयीन मुली गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वारजे पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल 

केला आहे.

या घटनेने पुन्हा एकदा पुण्यातील गुन्हेगारी समोर आली आहे. किरकोळ कारणांनी हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात नातेवाईकांमध्ये देखील आता हल्ले होऊ लागल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे पोलिसांकडून कोणती ठोस पाऊले उचलली जातात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाची २०२१ पर्यंतची आकडेवारी उपलब्ध आहे. त्यानुसार २०२१ पर्यंत अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांची एक लाख ४९ हजार ४०४ प्रकरणे नोंदली गेली. हे प्रमाण २०२० पेक्षा १६ टक्क्यांनी अधिक आहे. यापैकी अल्पवयीन मुलांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची संख्या ३१ हजार १७० असून २०२० च्या तुलनेत त्यात ४.७ टक्के वाढ आहे. यामध्ये प्रामुख्याने १६ ते १८ वर्षे वयोगटातील गुन्हेगारांचा सहभाग ७६.२ टक्के आहे. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story