सात महिन्यांत २२६ सराईतांना 'मोक्का'

संघटित गुन्हेगारीवर आळा बसावा म्हणून चालू वर्षाच्या मागील सात महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २२६ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांतील ही सर्वाधिक मोठी कारवाई आहे. यंदाच्या वर्षात २४ संघटित टोळ्यांवर कारवाई झाली असून, यातील सराईतांची संख्या २२६ एवढी आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Tue, 1 Aug 2023
  • 12:07 am
सात महिन्यांत २२६ सराईतांना 'मोक्का'

सात महिन्यांत २२६ सराईतांना 'मोक्का'

पिंपरी-चिंचवड पोलिसांची गेल्या ६ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई; चालू वर्षात २४ संघटित टोळ्यांना वेसण

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

संघटित गुन्हेगारीवर आळा बसावा म्हणून चालू वर्षाच्या मागील सात महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २२६ जणांवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर गेल्या सहा वर्षांतील ही सर्वाधिक मोठी कारवाई आहे. यंदाच्या वर्षात २४ संघटित टोळ्यांवर कारवाई झाली असून, यातील सराईतांची संख्या २२६ एवढी आहे.

संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी अक्षरशः कंबर कसल्याचे दिसून येत आहे. संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांना रेकॉर्डवर घेऊन त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ८५ टोळ्या रेकॉर्डवर घेऊन त्यांना वेसण घातल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

पिंपरी परिसरातील यशवंत डोंगरे टोळी, तळेगाव दाभाडे परिसरातील सुधीर परदेशी टोळी आणि भोसरी परिसरातील सौरभ मोतीरावे या तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) सोमवारी नव्याने कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी परिसरातील टोळीप्रमुख यशवंत उर्फ अतुल सुभाष डोंगरे (वय २२), सुशांत उर्फ दगडी आणणा अनिल जाधव (वय १९), आकाश रंजन कदम (वय २१), शुभम कैलास हजारे (वय २५), सुशांत उर्फ भैया आजिनाथ लष्करे (वय २२), मयूर प्रकाश परब (वय २२), कृष्णा धोंडीराम शिंदे (२५, सर्व रा. पिंपरी), अजिंक्य अरुण टाकळकर (२१, रा. मोशी) या टोळीवर गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.

तळेगाव दाभाडे परिसरातील टोळीप्रमुख सुधीर अनिल परदेशी (वय २५, रा. केशवनगर, वडगाव मावळ), विवेक (नाव, पत्ता माहीत नाही) या टोळीवर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. भोसरी परिसरातील टोळीप्रमुख सौरभ संतुराम मोतीरावे (वय २०, रा. आळंदी), आकाश गोविंद शर्मा (वय २२, भोसरी), राम सुनील पुजारी (वय २१, रा. मोशी), ओमकार मल्हारी दळवी (रा. दिघी) या टोळीवर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या तिन्ही टोळ्यांमधील गुन्हेगारांवर पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी, कोपरगाव पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दुखापत करून जबरी चोरी करणे, दहशत निर्माण करणे, दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरणे, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील, डॉ. काकासाहेब डोळे साहाय्यक आयुक्त सतीश माने, बाळासाहेब कोपनर, पद्माकर घनवट, सतीश कसबे आदींनी यासाठी विशेष पथक तयार करून ही कारवाई केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story