एमसी स्टॅन आणि सलमान हाजिर हो...

प्रसिद्ध बिग बॉसच्या १६ व्या रीयॅलिटी शोमधील विजेता अल्ताफ शेख ऊर्फ एमसी स्टॅन याने सलमान खानबरोबर असलेला एका प्रसिद्ध छायाचित्रकाराचा फोटो स्वतःचा असल्याचे दाखवत प्रसारित केल्याबद्दल त्याला आता खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. पुण्यातील छायाचित्रकार पुरुषोत्तम कढे यांनी दिवाणी न्यायाधीश व्ही. आर. राणे यांच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 22 Mar 2023
  • 10:56 am
एमसी स्टॅन आणि सलमान हाजिर हो...

एमसी स्टॅन आणि सलमान हाजिर हो...

प्रसिद्ध छायाचित्रकाराचा फोटो स्वतःचा दाखवत प्रसारित केल्याबद्दल पुणे न्यायालयाचे दोघांनाही हजर राहण्याचे आदेश

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

प्रसिद्ध बिग बॉसच्या १६ व्या रीयॅलिटी शोमधील विजेता अल्ताफ शेख ऊर्फ  एमसी स्टॅन याने  सलमान खानबरोबर असलेला एका प्रसिद्ध छायाचित्रकाराचा फोटो स्वतःचा असल्याचे दाखवत प्रसारित केल्याबद्दल  त्याला आता खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. पुण्यातील छायाचित्रकार पुरुषोत्तम कढे यांनी दिवाणी न्यायाधीश व्ही. आर. राणे यांच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे.

न्यायालयाने या संदर्भात तक्रारदाराची बाजू ऐकून घेत  एमसी स्टॅन, सलमान खान आणि अन्य व्यक्तींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खटल्याची पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे.

पुरुषोत्तम कढे हे व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. १९८८ सालापासून ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये छायाचित्रकाराचे काम करत आहेत.  यासोबतच पुण्यातील विविध वर्तमानपत्रांसाठी मुक्त छायाचित्रकार म्हणून अनेक वर्षांपासून काम करत आहेत.  विविध क्षेत्रातल्या सेलिब्रिटींबरोबर स्वतःचे छायाचित्र काढण्याचा त्यांचा छंद आहे. कढे यांच्या तक्रारीनुसार, अल्ताफ शेख ऊर्फ स्टॅन याने त्यांचा १९८९-९० सालचा सलमान खान सोबतचा एक जुना फोटो स्वतःच्या नावाने सोशल मीडियावर प्रकाशित केला आहे. दाद  मागण्यासाठी कढे यांनी पुण्यातील कनिष्ठ दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. 

कढे यांच्या याचिकेनुसार, "कढे यांचा १९९० सालातील सलमान खान सोबतचा एक फोटो  स्टॅन  याच्याशी मिळता जुळता आहे. तो बिगबॉसचा विजेताही आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचे प्रक्षेपण संपले आहे.  त्याचे  सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता सलमान खान करत होता.  या मालिकेमध्ये अल्ताफ शेख याने पुरस्कार मिळवलेला आहे. याचा फायदा घेत जाब देणार असलेला  स्टॅन याने कढे यांचा सलमान खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर प्रकाशित केला. तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित झाला."

कढे सीविक मिररशी म्हणाले, " माझा फोटो शेख ऊर्फ स्टॅन याने  स्वतःच्या नावाने प्रसारित केला, यावर माझा आक्षेप आहे.  शेख याने जाणीवपूर्वक फोटो प्रसारित करून माझी प्रतिमा मलिन केली. त्याचा माझ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, त्यामुळे दावा केला आहे."

कढे यांची बाजू मांडणारे वकील, वाजेद खान-बीडकर म्हणाले, " इंस्टाग्राम, रिल्स, ट्विटर, फेसबुक आणि इतर माध्यमांवर कढे यांच्या फोटोचे प्रसारण करण्यात आले आहे. त्यासाठी कढे यांची कोणतीही परवानगी शेख याने घेतलेली नाही. अशाप्रकारे फोटोचा बेकायदेशीर वापर केल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कढे यांनी केली आहे. तसेच शेख याच्याकडून नुकसान भरपाई मिळावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. जाब देणार प्रसिद्ध व्यक्ती असले तरी हे त्याचे कृत्य कायद्याला धरून नाही." 

एमसी स्टॅन हा प्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे. भारतासह जगभरात तो आपल्या रॅप गाण्यांद्वारे खूप लोकप्रिय आहे. नुकताच तो बिग बॉस १६ चा विजेता बनला. इन्स्टाग्रामवर त्याचे ७.८ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story