प्रियकराने दिली मरण्याची धमकी; प्रेयसीने मृत्यूला कवटाळले

विषारी औषध प्यायल्याची ध्वनिचित्रफीत मोबाइलवर पाठवून प्रियकराने तरुणीला धमकी दिल्याने तरुणीने सासवड रस्त्यावरील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकराच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 23 Apr 2023
  • 12:40 am
प्रियकराने दिली मरण्याची धमकी; प्रेयसीने मृत्यूला कवटाळले

प्रियकराने दिली मरण्याची धमकी; प्रेयसीने मृत्यूला कवटाळले

विवाहासाठी युवकाने वापरले धमकीचे अस्त्र; युवतीने केली आत्महत्या

#लोणी काळभोर

विषारी औषध प्यायल्याची ध्वनिचित्रफीत मोबाइलवर पाठवून प्रियकराने तरुणीला धमकी दिल्याने तरुणीने सासवड रस्त्यावरील एका लाॅजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकराच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अक्षय अरुण जोरे (रा. भेकराईनगर, हडपसर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तरुणीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २१ वर्षीय तरुणी कोंढवा भागात राहायला होती. तिचे आरोपी अक्षयशी प्रेमसंबंध होते. अक्षय तिला विवाहासाठी धमकावत होता. माझ्याशी विवाह न केल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने तिला दिली होती.

आरोपी अक्षयने मोबाइलवर विषारी औषध पिऊन आत्महत्या करत असल्याची ध्वनिचित्रफीत पाठविली होती. त्यानंतर तरुणी घाबरली. मला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तुझ्यावर गुन्हा दाखल होईल, अशी धमकी अक्षयने तरुणीला दिली होती. सासवड रस्त्यावरील वडकी भागात एका लाॅजमध्ये तरुणीने भाड्याने खोली घेतली. तिने लाॅजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर लाॅज व्यवस्थापकाने लोणी काळभोर पोलिसांना ही माहिती दिली. दरम्यान, तरुणीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. अक्षयने मुलीला धमकी दिली होती. त्याच्या धमकीमुळे तिने आत्महत्या केली, असे तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story