दागिना आवडला, मॉलमधून चोरला
सीविक मिरर ब्यूरो
गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एका आयटी अभियंता असलेल्या तरुणीस चोरीच्या गुन्हयात गुरुवारी अटक केली आहे. ितने एका मॉलमधील सराफी दुकानातून २ लाख ८२ हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरले होते. तीच्या तपासात तीने एक वर्षापुर्वी असाच एक गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
"मला दागिना आवडला, म्हणून मी तो चोरला' असे अजब उत्तर तीने पोलिसांना दिले आहे. विशेष म्हणचे तीला आयटी अभियंता म्हणून ४५ हजार पगार आहे. मुळच्या दिल्लीत रहाणाऱ्या आणि नोकरीनिमीत्त वडगाव शेरीत रहाणाऱ्या एका ३0 वर्षीय तरुणीस अटक करुन विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिनिक्स मार्केट सिटी येथील ब्लु स्टोन ज्वेलरीच्या दुकानातून ५ मार्च रोजी २ लाख ८२ हजार रुपयांच्या ब्रेसलेटची चोरी झाली होती. पोलिसांनी तपास केला असता, आरोपी तरुणीने दागिने खरेदीच्या बहाण्याने हे ब्रेसलेट चोरले होते. चोरी केल्यानंतर ती स्कुटीवरुन पळून गेली होती. पोलिसांनी ती वडगाव शेरी येथे एका सोसायटीमध्ये रहात असल्याची खबर मिळाली.
त्यानूसार गुन्हे शाखा युनिट चारचे पथक तीचा शोध घेत तेथे गेले. या सोसायटीचे पार्किंगमध्ये तीची स्कुटी पार्क केलेली दिसली. त्याबाबत अधिक माहिती घेता सोसायटीतील तिस-या मजल्यावर ती रहात असल्याचे समजले. पोलीस अंमलदार वैशाली माकडी यांनी तीस ताब्यात घेवून, चोरलेले ब्रेसलेट जप्त केले.
तीच्याकडे अधिक तपास करता, तीने जून २०२२ मध्ये फिनिक्स मॉल येथील रिलायन्स ज्वेल्स येथे अशाच पध्दतीने एक सोन्याची बांगडी चोरुन नेल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश माने यांचे मार्गदर्शना खाली सहा पोलीस निरीक्षक, विकास जाधव, पोलीस अंमलदार संजय आढारी, प्रविण भालचिम, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, वैभव रणपिसे, वैशाली माकडी यांनी केली आहे.