लव्ह इज लव्ह...
तृतीयपंथी, लिंगबदल केलेले आणि समलैंगिक व्यक्तींनी एकत्र येत रविवारी (दि. ४) ‘पुणे प्राईड परेड’चे आयोजन केले होते. कमिन्स इंडियातर्फे तसेच बिंदू क्विअर राईट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज गार्डन ते फर्ग्युसन रोड या मार्गावर झालेली ही परेड लक्षवेधी ठरली. आपल्या हक्कांसाठी या नागरिकांनी काढलेल्या परेडमधून ‘लव्ह इज लव्ह’ हा संदेश देण्यात आला.