माथाडीच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी अटकेत

माथाडीच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. रमाकांत ऊर्फ बबलू राजेंद्र जोगदंड (वय ३०, रा. वाकड), समीर ऊर्फ बबलू नझीर शेख (वय ३३, रा. काळेवाडी), मयूर बाळासाहेब सरोदे (वय २३) आणि करण सदाफळ चव्हाण (वय २४, दोघेही रा. पुनावळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 13 Jul 2023
  • 12:51 am
माथाडीच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी अटकेत

माथाडीच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी अटकेत

#पिंपरी

माथाडीच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. रमाकांत ऊर्फ बबलू राजेंद्र जोगदंड (वय ३०, रा. वाकड), समीर ऊर्फ बबलू नझीर शेख (वय ३३, रा. काळेवाडी), मयूर बाळासाहेब सरोदे (वय २३) आणि करण सदाफळ चव्हाण (वय २४, दोघेही रा. पुनावळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अनिकेत रवींद्र वाडिया (वय २४, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आरोपी जोगदंड आणि त्यांच्या साथीदारांनी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असल्याचा दावा करत माझ्या परवानगीशिवाय येथे कामगार कसे ठेवले, कसे काम करत आहेत, असे म्हणत फिर्यादी अनिकेतला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. घड्याळ, अंगठी जबदरस्तीने काढून नेली. आरोपी जोगदंड, शेख हे दोघे वाशी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक केले. आरोपी जोगदंड हा सराईत असून, माथाडी वाहन सुरक्षारक्षक कामगार युनियनचा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहे. दुसऱ्या एका कारवाईत सुरेश बाबूराव बनसोडे (वय ३७, रा. रहाटणी) याला अटक केली आहे. त्याने दहा हजारांची खंडणी मागत ट्रकची काच फोडली होती. तो माथाडी जनरल कामगार युनियन ट्रान्सपोर्टचा पिंपरी-चिंचवड सचिव असल्याचे सांगत लूटमार करत होता.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story