बचतगटाच्या मार्केटिंगसाठी लटपटे जगभ्रमंतीवर

महाराष्ट्रातील बचतगटाच्या माध्यमातून बनवलेले विविध पदार्थ जगभर पोहोचावेत यासाठी पुण्यातील रमिला लटपटे या जगभ्रमंती करणार आहेत. एक लाख किलोमीटरचा प्रवास करत जगभरातल्या ३० देशांना त्या भेट देणार आहेत. हा संपूर्ण प्रवास महाराष्ट्रीयन पोशाखात दुचाकीवरून एकट्या करणार आहेत. भारतात लघू उद्योजकांनी बनवलेल्या वस्तूंना जगात ओळख आणि बाजारपेठ मिळावी यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. यासोबतच महाराष्ट्रीयन संस्कृतीचा प्रसार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 7 Mar 2023
  • 11:34 pm
बचतगटाच्या मार्केटिंगसाठी लटपटे जगभ्रमंतीवर

बचतगटाच्या मार्केटिंगसाठी लटपटे जगभ्रमंतीवर

भारतीय महिलांची चिकाटी आणि संस्कृतीची करून देणार ओळख; महिला दिनाच्या दिवशी प्रवासास सुरुवात

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

महाराष्ट्रातील बचतगटाच्या माध्यमातून बनवलेले विविध पदार्थ जगभर पोहोचावेत यासाठी पुण्यातील रमिला लटपटे या जगभ्रमंती करणार आहेत. एक लाख किलोमीटरचा प्रवास करत जगभरातल्या ३० देशांना त्या भेट देणार आहेत. हा संपूर्ण प्रवास महाराष्ट्रीयन पोशाखात दुचाकीवरून एकट्या करणार आहेत. भारतात लघू उद्योजकांनी बनवलेल्या वस्तूंना जगात ओळख आणि बाजारपेठ मिळावी यासाठी त्या प्रयत्न करणार आहेत. यासोबतच महाराष्ट्रीयन संस्कृतीचा प्रसार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

९ मार्चला गेट वे ऑफ इंडिया येथून त्या प्रवासाला निघणार आहेत. भारतीय महिला साहसी, जिद्दी आहेत, हा संदेश जगाला देण्यासाठी त्यांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी प्रवासाला सुरुवात करत असल्याचे सांगितले.  ३६५ दिवसांची जगभ्रमंती करून ८ मार्च २०२४ ला त्या भारतात परतणार आहेत. रमिला लटपटे या पिंपरी- चिंचवडमधील रहिवासी आहेत. वयाच्या अठराव्या वर्षांपासून त्यांना भटकंतीची आवड आहे. तेव्हापासून त्या भारत भ्रमंती करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "डेव्हलपमेंट इंडिया" भाषणाने प्रभावित होऊन त्या जगभ्रमंतीला निघाल्या आहेत. रमिला सांगतात, भारतीयांमध्ये खूप कौशल्य आहेत. त्यांनी बनवलेल्या वस्तू रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या पाहून दुःख होते. या उत्पादनाला जगात ओळख मिळायला हवी. तसेच भारतीय संस्कृती महान आहे. येथे खूप विविधता आहे. येथली कला, संस्कृती, परंपरा याचा जगात प्रसार झाला पाहिजे या उद्देशाने मी जगभ्रमंतीला निघाले आहे. यामुळे भारताची महानता जगाला कळण्यास मदत होईल. समाजमाध्यमातून जी माहिती जाते ती ठराविक काळानंतर विस्मरणात जाते. प्रत्यक्ष भेटून सांगितल्याने समाजमाध्यमांपेक्षा मोठा प्रभाव पडतो. या जगभ्रमंतीमध्ये दिवसाला ५०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास त्या करणार आहेत. मी प्रसिद्धीसाठी किंवा समाजमाध्यमावरील लाईक्ससाठी प्रवास करत नसून 'भारत की बेटी' साहसी आहे हा संदेश जगाला द्यायचा आहे. महिलांच्या मनातील गुलामीचा अंश काढून टाकायचा आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचा पारंपरिक पोशाख नऊवारी साडी जगाला माहिती व्हावी म्हणून याच पोशाखात त्या संपूर्ण प्रवास करणार आहेत.  

महाराष्ट्रातील मसाल्याचे पदार्थ, नथ, नऊवारी साडी, सौंदर्यप्रसाधने यासारख्या अनेक वस्तूंची माहिती त्या ठिक-ठिकाणी थांबून देणार आहेत. या प्रवासामध्ये इशा फाउंडेशनचे जग्गी वासुदेव त्यांची अनेक ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय करणार आहेत. याशिवाय एस. एस. नगरकर ज्वेलर्स, क्रिडाई पुणे महामेट्रो असे अनेकजण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका रमिला यांना विविध बचतगटांनी बनवलेल्या वस्तू देणार आहे. भारत की बेटी म्हणून मी हा प्रवास करणार आहे. त्यामुळे भारतीयांनी मला एक रुपयांची मदत करावी, असे त्यांनी आवाहन केले आहे. त्यासाठी हा ९७६५०००२४१ क्रमांक त्यांनी दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story