शिरगावच्या सरपंचांवर कोयत्याने केले वार

प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शिरगावच्या सरपंचांवर रविवारी सकाळी धारधार शस्त्रांनी हल्ला झाला. या हल्ल्यात सरपंचाचा मृत्यू झाला आहे. प्रवीण गोपाळे असे या मृत सरपंचाचे नाव आहे. या हल्ल्यानंतर गोपाळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 3 Apr 2023
  • 01:18 am
शिरगावच्या सरपंचांवर कोयत्याने केले वार

शिरगावच्या सरपंचांवर कोयत्याने केले वार

जमिनीच्या वादातून हल्ला झाल्याचा संशय; सरपंचांचा जागीच मृत्यू

#शिरगाव

प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील शिरगावच्या सरपंचांवर रविवारी सकाळी धारधार शस्त्रांनी हल्ला झाला. या हल्ल्यात सरपंचाचा मृत्यू झाला आहे. प्रवीण गोपाळे असे या मृत सरपंचाचे नाव आहे. या हल्ल्यानंतर गोपाळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला नेमका का करण्यात आला? हे हल्लेखोरांच्या अटकेनंतर स्पष्ट होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही धक्कादायक घटना प्रतिशिर्डी मंदिरासमोरच घडली. जमिनीच्या प्लॉटिंगमधून ही हत्या झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे. दरम्यान प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते.

तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोपाळेंवर कोयत्याने हल्ला केला. हत्येच्या चार मिनिटांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

हल्लेखोरांनी अवघ्या पंचवीस सेकंदात होत्याचे नव्हते केल्याची भावना व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोपाळे हे साईबाबांच्या मंदिरासमोरील मार्गावर दुचाकीला खेटून एकाशी बोलत उभे असल्याचे दिसते. त्याचवेळी सकाळ ९ वाजून ६ मिनिटांनी एका दुचाकीवरून दोघेजण आले अन यूटर्न घेऊन निघून गेले. मग ९ वाजून ८ मिनिटांनी तिघे आले अन् ते तसेच पुढे गेले. तर पुढच्या एक ते दीड मिनिटांनी ते तिघे पुन्हा दुचाकीवरूनच आले, यावेळी मात्र त्यांनी थेट गोपाळे यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला. पहिलाच प्रहार गोपाळेंच्या डोक्यावर केला. अचानक झालेल्या हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी गोपाळे सैरावैरा धावू लागले. मात्र दहा फुटांवरच या हल्लेखोरांनी त्यांना पुन्हा घेरले अन् तिथेही कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार केले. पंचवीस सेकंदापूर्वी गोपाळे यांना त्यांच्याबाबत असे  काही घडेल याची कल्पना ही नसावी. पण पुढच्या पंचवीस सेकंदात ते भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर गोपाळे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. जमिनीच्या प्लॉटिंगवरून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. मात्र हल्लेखोरांना बेड्या ठोकल्याशिवाय मूळ कारण समोर येणार नाही. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story