रस्त्याचे राजे ठरले प्रशंसेचे मानकरी
पुणे वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणाऱ्या पुणेकर स्वयंसेवकांनी वय ही केवळ संख्या असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ‘सीविक मिरर ’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेल्या ‘जरा देख के चलो’ या उपक्रमात जबाबदार पुणेकर मोठ्या उत्साहाने आणि संख्येने सहभागी झाले. समाजाच्या सर्व क्षेत्रातील, वयोगटातील नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपली सामाजिक जबाबदारी निभावली. यामध्ये बच्चे कंपनी जशी होती तशीच मुले, युवा-युवती, प्रौढ, ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. या सर्वांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे राहण्यासाठी पुणे अधिक सुंदर आणि चांगले बनावे हा. पुणेकरांनी ज्या उत्साहाने आमच्या उपक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला, त्यामुळे आम्ही भारावून गेलो असून त्यांच्या मदतीसाठी, पाठिंब्याबाबत आभार मानण्यासाठी शब्दही अपुरे ठरतात. त्याचबरोबर अधिकाधिक पुणेकरांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावावे यासाठी आम्ही त्यांना निमंत्रित करत आहोत. चला, उठा, ‘जरा देख के चलो’ या उपक्रमासाठी आपले नाव नोंदवा आणि बना रस्त्याचे राजे. कारण, बस्स झाल्या तक्रारी, तक्रारी सोडविण्यासाठी आपणच पाऊल उचलू या !
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.