अनैतिक संबंधांसाठी पोटच्या पोरीचा खून

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलीचा आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आईसह प्रियकराला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 7 Mar 2023
  • 11:47 pm
अनैतिक संबंधांसाठी पोटच्या पोरीचा खून

अनैतिक संबंधांसाठी पोटच्या पोरीचा खून

खडकीत प्रियकराच्या मदतीने अडीच वर्षांच्या चिमुकलीला संपवले

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलीचा आईने तिच्या प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आईसह प्रियकराला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.

समीक्षा संतोष गवई असे खून झालेल्या अडीच वर्षांच्या बालिकेचे नाव आहे. या प्रकरणी समीक्षाची आई लक्ष्मी (वय ३२, रा. अकोला) आणि प्रियकर संतोष देवमन जामनिक (वय ३१ रा. खिरपुरी बुद्रुक, ता. बाळापूर, जि. अकोला) यांना अटक करण्यात आली आहे. लक्ष्मीचा पती संतोष व्यसनी असल्याने तिचे पतीशी पटत नव्हते. लक्ष्मीचे माहेर अकोला जिल्ह्यातील खिरपुरी गावात आहे. आरोपी संतोष या गावात राहात आहे. पतीशी पटत नसल्याने लक्ष्मी माहेरी गेली होती. तिचे गावातील संतोष याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

संतोष काही महिन्यांपूर्वी पुण्यात कामासाठी आला होता. आठवड्यापूर्वी लक्ष्मी अडीच वर्षांची मुलगी समीक्षा हिला घेऊन प्रियकर संतोषला भेटण्यासाठी पुण्यात पळून आली होती. लक्ष्मीने दोन मोठ्या मुली आणि मुलाला माहेरी ठेवले होते. संतोषबरोबर ती दापोडी परिसरात राहात होती. अनैतिक संबंधात अडीच वर्षांची मुलगी अडथळा ठरत असल्याने चार दिवसांपूर्वी लक्ष्मी आणि तिचा प्रियकर संतोष यांनी समीक्षाचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह खडकी परिसरात टाकून दोघेजण पसार झाले होते. दरम्यान, या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत होता. गुन्हे शाखेचे युनिट चार आणि खडकी पाेलिसांच्या पथकाने खडकी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे तपास केला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story