जीवो जीवस्य जीवनम
कडुलिंबावर वड निसर्गात प्रत्येक जीव दुसऱ्या जिवावर अवलंबून असतो, हे खरे असले, तरी इथे मात्र काळीकभिन्न कातळे फोडण्याची क्षमता असलेल्या स्वयंभू वटवृक्षाने एका मृत कडुलिंबाचा आधार घेत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. जागतिक पर्यावरणदिनाच्या (५ जून) पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्यालगतच्या कॅनॉल रोडवरील हे छायाचित्र टिपले आहे 'सीविक मिरर'चे छायावृत्तकार
राहुल देशमुख यांनी..