'Jara Dekh Ke Chalo' : ‘जरा देख के चलो’ झाली लोकचळवळ!

वाहतूक प्रश्नांबाबत केवळ तक्रारी करण्याने काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा हा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांना मदत करून वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणेकर आता कृती करत आहेत. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना शिस्तीचा धडा शिकवण्यासाठी आणि नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या हातात काठी आणि शिट्टी ही आयुधे आली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 7 May 2023
  • 03:23 pm
‘जरा देख के चलो’ झाली लोकचळवळ!

‘जरा देख के चलो’ झाली लोकचळवळ!

वाहतूक प्रश्नांबाबत केवळ तक्रारी करण्याने काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा हा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांना मदत करून वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणेकर आता कृती करत आहेत. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना शिस्तीचा धडा शिकवण्यासाठी आणि नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांच्या हातात काठी आणि शिट्टी ही आयुधे आली आहेत. ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेली ‘जरा देख के चलो’ ही सुरक्षित रस्ते मोहीम तीस महत्त्वाच्या चौकात सुरू आहे. येथे पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत पुणेकर. या मोहिमेमुळे पुणेकरांना आपली जबाबदारी समजली आहे. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांना कोणत्या स्थितीला सामोरे जावे लागते, याचीही कल्पना आली आहे. 

शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत व्हावी असे एकाद्याला वाटत असेल तर ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हाती घेतलेला ‘जरा देख के चलो’ हा विशेष उपक्रम त्यांना रस्त्याचा राजा बनण्याची संधी देत आहे. सारख्या सारख्या तक्रारी करत बसण्यापेक्षा आता आपणच पुढे होऊन  ‘जरा देख के चलो’ उपक्रमाने दिलेल्या संधीचा लाभ घेऊया आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. मदतीचा प्रत्येक हात काही ना काही सकारात्मक बदल नक्की घडवेल, हे नक्की.!

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story