हडपसरमध्ये आईनेच केली चिमुकलीची हत्या

पुण्यातील हडपसर परिसरात एका आईने आपल्या ४ वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी आईला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 03:27 pm

हडपसरमध्ये आईनेच केली चिमुकलीची हत्या

आरोपी महिला हडपसर पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील हडपसर परिसरात एका आईने आपल्या ४ वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी आईला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुण्यातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून खून, बलात्कार, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. सध्या एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे शहरात शोककळा पसरली आहे. एका निर्दयी आईने आपल्या ४ वर्षांच्या चिमुकलीवर चाकूने सपासप वार केले. 

ही घटना हडपसर येथील ससाणे नगर परिसरातील सिद्धीविनायक दुर्वांकुर सोसायटीमध्ये रात्री ८ च्या सुमारास घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आईला अटक केली. दरम्यान, आरोपी आईने ही हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिला तिच्या मुलगीसोबत घरी एकटीच राहत होती. तिचे बेकरीचा व्यवसाय असून तो महिनाभरापूर्वी स्थलांतरित करण्यात आला होता. त्यामुळे, संबंधित महिला भाड्याचे घर सोडणार होती. याबाबत माहिती मिळाताच घर मालक पाहणी करण्यात आला होता. महिलेच्या घराचा दरवाजा आतून बंद केला होता. महिलेला शेजाऱ्यांनी आणि घर मालकाने दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही.

अखेर घर मालक आणि शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असताना मुलीचा मृतदेह आढळून आला. घर मालकाने तात्काळ पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळाताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळ धाव घेवून आईला ताब्यात घेतले. हडपसर पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story