चिंचवडमध्ये १४ लाख ताब्यात

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या स्थिर संनियंत्रण पथकाने शुक्रवारी (दि. २४) दुपारी दळवीनगरमधील भाजी मंडई परिसरात एका वाहनात आढळून आलेली सुमारे १४ लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sat, 25 Feb 2023
  • 02:41 pm
चिंचवडमध्ये १४ लाख ताब्यात

चिंचवडमध्ये १४ लाख ताब्यात

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या स्थिर संनियंत्रण पथकाने शुक्रवारी (दि. २४) दुपारी दळवीनगरमधील भाजी मंडई परिसरात एका वाहनात आढळून आलेली सुमारे १४ लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली.

निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले आणि आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आबासाहेब ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाने ही कामगिरी केली आहे.

या पथकाद्वारे निवडणूक कालावधीमध्ये बेकायदेशीर वस्तू, मद्य, ताडी इत्यादींची वाहतूक, रोख रकमेची वाहतूक, शस्रास्त्रे अशा बाबींवर देखरेख ठेवण्यात येते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, याबाबत तत्काळ आयकर विभागास कळविण्यात आले. त्यानंतर आयकर विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाईसाठी संबंधित व्यक्ती, वाहन आणि आढळून आलेली रोख रक्कम पंचनामा करून आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली.

एसएसटी पथकाद्वारे चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध भागात वाहनांची तपासणी करण्यात येत असून २४ तास हे पथक कार्यरत आहे. या पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत असून आचारसंहिताभंगाबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने बारकाईने नजर ठेवली जात आहे. नाका, चेकपोस्ट अशा ठिकाणीही हे पथक तपासणी करीत असून मतदानापूर्वी शेवटच्या ४८ तासांत अधिक बारकाईने लक्ष देण्यात येत आहे.

आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू असून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता सर्व संबंधित पथकांनी घ्यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story